12360_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 16:45 IST
द मुंबई अकॅडमी आॅफ मुव्हिंग इमेज अर्थात मामीच्या १८ व्या फिल्म फेस्टीव्हल संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बॉलीवूडच्या फिल्म इंडस्ट्रीजमधील ख्यातनाम निर्माते, दिग्दर्शक एकत्र आले होते.
12360_article
द मुंबई अकॅडमी आॅफ मुव्हिंग इमेज अर्थात मामीच्या १८ व्या फिल्म फेस्टीव्हल संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बॉलीवूडच्या फिल्म इंडस्ट्रीजमधील ख्यातनाम निर्माते, दिग्दर्शक एकत्र आले होते.निर्माता करण जोहरची स्टाईल सर्वांनाच भावली. झोयाच्या वक्तव्यापेक्षा तिने घातलेल्या ड्रेसकडे सर्वांचे अधिक लक्ष्य होते. आमिर खानची पत्नी किरणने खूप छानपणे माहिती दिली. तिच्या चेहºयावरील भाव पाहण्याजोगे होते. निर्माता दिग्दर्शक विशालने आपली भूमिका मांडली. सिद्धार्थ रॉय कपूर यांनी किरण राव यांच्याशी छान गप्पा मारल्या. या पत्रकार परिषदेत दिबाकर बॅनर्र्जीं यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अनुराग कश्यप, सिद्धार्थ रॉय कपूर आणि करण जोहर कोणत्या गोष्टीवर हसत असतील बरे? बराच काळ चाललेल्या या कार्यक्रमात विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांना बहुदा कंटाळा आला असावा. यावेळी दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर, किरण राव, विक्रमादित्य मोटवानी, विशाल भारद्वाज, सिद्धार्थ रॉय कपूर, करण जोहर, अनुराग कश्यप, मुंबई फिल्म फेस्टीव्हलच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर स्मृती किरण आणि रोहन सिप्पी हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात आलेल्या कंगनाने सारा नूरच बदलला. निर्माता करण जोहरची स्टाईल सर्वांनाच भावली.