Join us
Daily Top 2Weekly Top 5

करीनापासून ते नेहा धूपियापर्यंत डिलेव्हरी आधीच समोर आले होते अभिनेत्रींचे असे फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:08 IST

1 / 8
अभिनेत्री समीरा रेड्डी प्रेग्नंसीवेळी बरीच चर्चेत होती. बेबी बंप फ्लाँट केलेले फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 12 जुलै 2019 रोजी समीराने मुलीला जन्म दिला होता.
2 / 8
एमी जॅक्सन स्वतःचे नवनवीन फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत. सोशल मीडियावर गरोदरपणातले अनेक फोटो व्हायरल झाले होते.बेबी बंप दाखवत डान्सही केला होता. सप्टेंबर 2019 मध्ये तिने गोंडस बाळाला जन्म दिला होता.
3 / 8
सेलिना जेटलीने दोन वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला होता. प्रेग्नंसीवेळची प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसह शेअर करायची. मार्च २०१२ मध्ये तिने विन्स्टन आणि विराजला जन्म दिला. त्याच वेळी सप्टेंबर 2017 रोजी, ती पुन्हा जुळ्या मुलांची आई बनली.
4 / 8
कल्कीनेही गरोदरपणाच्या बातमीने सर्वांनाच चकित केले होते. दिग्दर्शक अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती बॉयफ्रेंड गाय हर्षबर्गसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. यावर्षी तिने 7 फेब्रुवारी 2020 रोजी पहिल्या बाळाला जन्म दिला होता. कल्कीदेखील लग्नाआधीच गरोदर राहिली होती.
5 / 8
करिना कपूरने तरतिची प्रेग्नंसी ख-या अर्थाने ग्लॅमरस बनवली होती. गरोदर अवस्थेत तिने रॅम्पवॉक करत एक नवीन ट्रेंड सुरू केला होता. 20 डिसेंबर 2016 रोजी करीना आणि सैफ अली खान पालक बनले होते. आज त्यांचा मुलगा तैमूर अली खान हा लोकांचा आवडता स्टारकिड आहे.
6 / 8
सोशल मीडियावर बेबी बंपसह अभिनेत्री लिसा हेडनचे फोटोही खूप व्हायरल झाले. फेब्रुवारी 2020 मध्ये अभिनेत्री दुस-यांदा बाळाला जन्म दिला होता.
7 / 8
नेहा धुपियाने तर गरोदर असल्याच्या बातमीने सर्वांना चकित केले होते. खरं तर अंगद बेदीशी लग्नानंतरच तिने ६ महिन्याचे गरोदर असल्याचे सांगितले होते. त्यावेळी नेहाचा बेबी बंपही दिसू लागला होता. लग्नाआधीच गरोदर असल्यामुळे सा-यांना धक्काच बसला होता. 18 नोव्हेंबर 2018 रोजी नेहा आणि अंगद मुलगी मेहेरचे पालक बनले.
8 / 8
गेल्यावर्षी सुरवीन चावलाने मुलीला जन्म दिला. प्रेग्नन्सीदरम्यान तिने बेबी बंपसोबत फोटोशूट केले होते, ज्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. एप्रिल 2019 मध्ये सुरवीन आणि अक्षय पालक बनले होते.
टॅग्स :करिना कपूरनेहा धुपिया