Join us  

वडील प्रसिद्ध फिल्ममेकर, तरी अभिनेत्रीला करावा लागला संघर्ष; एक रुपया घेऊन बसने केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:50 AM

1 / 9
बॉलिवूड इंडस्ट्रीत घराणेशाही म्हणजेच नेपोटिझम अस्तित्वात आहेच. त्यामुळे स्टार कलाकारांच्या मुलांना इंडस्ट्रीत अगदी सहज संधी मिळते असंच सगळ्यांना वाटतं. मात्र संधी मिळाली तरी पुढे त्यांना स्वत:ला आपल्या टॅलेंटनेच सिद्ध करावं लागतं.
2 / 9
मात्र याला अपवाद अशी एक अभिनेत्री आहे जिला वडील फिल्ममेकर असूनही संघर्ष करावा लागला. 90s च्या या अभिनेत्रीने नुकताच तिच्या स्ट्रगल काळाचा खुलासा केला. कोण आहे ती अभिनेत्री?
3 / 9
90 चा काळ गाजवणारी ही अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. 'दिलवाले','अंदाज अपना अपना','मोहरा' सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केले. तिच्या 'टिप टिप बरसा पानी' गाण्याची आजही क्रेझ आहे.
4 / 9
रवीना ही बॉलिवूडचे दिवंगत दिग्दर्शक-निर्माते रवी टंडन यांची मुलगी आहे. त्यांना ७० ते ८० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे बनवले. एका मुलाखतीत रवीनाने तिच्या संघर्षाचे दिवस आठवले.
5 / 9
रवीना म्हणाली, 'रवी टंडन माझे वडील असतानाही इंडस्ट्रीत मला कोणीच गॉडफादर नव्हता. मी स्वत:च माझा मार्ग शोधला. मी वडिलांची थोडीसुद्धा मदत घेतली नव्हती. त्यांनी मला केवळ मार्गदर्शन केलं.'
6 / 9
सुरुवातीला रवीनाला अभिनेत्री होण्यात रस नव्हता. पण एका शॅम्पूच्या जाहिरातीत काम केल्यानंतर माझं आयुष्य बदललं. झूमला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली, 'असं मुळीच नाही की माझे वडील माझ्यासाठी लोकांकडे गेले. त्यांनी मला फक्त काय चूक काय बरोबर हे सांगितलं. मी माझं करिअर स्वत:च बनवलं.'
7 / 9
आयुष्यातील चढ उतारांवर रवीना म्हणाली, 'प्रत्येक जण कठीण काळातून जातो. माझ्या वडिलांनीही असा काळ पाहिला. अनेकदा मी बसमधून प्रवास करायचे आणि माझ्याकडे केवळ १ रुपयाच असायचा. पैसे कमवण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे.'
8 / 9
रवीना सध्या आगामी 'पटना शुक्ला' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर २९ मार्चला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
9 / 9
रवीनाची लेक राशा थडानीही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती नुकतीच ग्रॅज्युएट झाली असून आता अभिनयाकडे वळली आहे. राशाचे आतापासूनच सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूडसेलिब्रिटी