Join us  

'हँस मत पगले प्यार हो जायेगा...' भूमीच्या हटके अदा, ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 4:06 PM

1 / 7
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर ही सध्या चर्चेत आली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'भक्षक' नावाचा चित्रपट. त्यात तिनं एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे.
2 / 7
भूमीच्या या भूमिकेचं सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. अगदी कमी वेळातच मनोरंजन विश्वात भूमीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांना आपलंस केलं.
3 / 7
अभिनेत्रीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. भूमी पेडणेकर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आली आहे.
4 / 7
भूमी आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींना टक्कर देते. तिची लाईफस्टाईल पण खूप लग्झरी आहे. हिंदी सिनेसृष्टीत भूमी आज एक सुपरहिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
5 / 7
२०१५ मध्ये आयुष्यमान खुरानासोबत तिने 'दम लगा के हईशा' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाने भूमीला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली.
6 / 7
'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान', 'सोन चिडिया', 'पती पत्नी और वो', 'बाला', 'सांड की आंख', 'बधाई दो', 'रक्षाबंधन' असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत.
7 / 7
नुकतंच भूमीने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केलेत. पिवळ्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये भूमीने तिच्या अदांनी नेटकऱ्यांना घायाळ केलंय.
टॅग्स :भूमी पेडणेकर बॉलिवूडसेलिब्रिटी