Join us  

PHOTOS : पन्नाशीच्या आयशा जुल्काचं ग्लॅमरस फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 1:49 PM

1 / 9
खिलाडी, जो जीता वही सिकंदर, हिम्मतवाला, वक्त हमारा है, संग्राम अशा अनेक सिनेमात झळकलेली अभिनेत्री आयशा जुल्का आताश: बॉलिवूडमधून गायब झालीये.
2 / 9
90 च्या दशकात याच आयशाने मोठा पडदा गाजवला होता. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अदा-अ वे ऑफ लाइफ’ या सिनेमानंतर तिने मोठा ब्रेक घेतला. यानंतर 2018 साली तिने कमबॅक केला. पण तिच्या कमबॅकची फारसी कुणी दखलही घेतली नाही.
3 / 9
2022 म्हणजे याचवर्षी आयशाने पुन्हा कमबॅक केलं. सध्या ती ओटीटीवर बिझी आहे. सध्या तिच्या फोटोशूटची चर्चा आहे.
4 / 9
होय, काही नवे फोटो आयशाने शेअर केले आहेत. या फोटोत आयशा कमालीची ग्लॅमरस दिसतेय.
5 / 9
2003 मध्ये आयशाने कंस्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत लग्न केलं. आता आयशा स्वत:ही एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे.
6 / 9
पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते. या सर्व बिझनेसचा व्याप अब्जावधीच्या घरात आहे.
7 / 9
अलीकडे एका मुलाखतीत आयशा याबद्दल बोलली होती. मी सध्या सॅमरॉक या कंपनीच्या कामात बिझी आहे. मी आणि माझ्या पतीने ही कंपनी उघडली असल्याचं तिने सांगितलं होतं.
8 / 9
लग्नानंतर आयशाने अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला. अर्थात बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचा आयशाला मुळीच पश्चाताप नाही. मात्र करिअरदरम्यान काही सिनेमे नाकारल्याचा पश्चाताप तिला आजही होतो.
9 / 9
मणिरत्नम यांचा ‘रोजा’ हा सिनेमा बिझी शेड्यूलमुळे मी नाकारला होता. मला आजही त्याची खंत वाटते. रामा नायडूंचा ‘प्रेम कैदी’ हा सिनेमा मी नाकारला. कारण यात मी बिकिनी सीन्स द्यावेत, अशी मेकर्सची इच्छा होती, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
टॅग्स :आयशा जुल्काबॉलिवूड