Join us  

प्रसिद्ध अभिनेत्यावर झाला लैंगिक अत्याचार; बऱ्याच वर्षांनी सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 12:41 PM

1 / 9
प्रसिद्ध गायक, गीतकार आणि अभिनेता पियुष मिश्रा सध्या त्यांच्या 'तुम्हारी औकात क्या हैं पियुष मिश्रा' या आत्मचरित्रामुळे चर्चेत येत आहेत.
2 / 9
पियुष मिश्रा यांनी २००० साली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
3 / 9
विशाल भारद्वाज यांच्या 'मकबूल', अनुराग कश्यप यांचा 'गुलाल' आणि २०१२ सालचा 'गॅग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटांमधून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
4 / 9
आपल्या अभिनयामुळे आणि गीतांमुळे ओळखले जाणारे पियुष सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.
5 / 9
बिंधास्तपणे आयुष्य जगणाऱ्या पियुष यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. यामध्येच त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
6 / 9
अलिकडेच पियूष मिश्रा यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं.
7 / 9
सातवीमध्ये असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. तसंच त्यांच्या आत्मचरित्रामध्येही याविषयीचा उल्लेख असल्याचं म्हटलं जातं.
8 / 9
'जवळपास ५० वर्षांपूर्वी आमच्या नात्यातील एका महिलेने माझ्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला होता. या प्रकाराचा परिणाम माझ्या मनावर इतका झाला होता की बरीच वर्ष मी त्या भीतीखाली जगत होतो,'
9 / 9
'तुम्हारी औकात क्या हैं पियुष मिश्रा' या आत्मचरित्रामध्ये पियुष यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. अगदी त्यांच्या फिल्मी करिअरपासून ते कुटुंबापर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडअनुराग कश्यप