By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 17:38 IST
1 / 8'बिग बॉस हिंदी'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच अंकिता आणि विकी घरातील चर्चेतील सदस्यांपैकी एक आहेत. 2 / 8अंकिता आणि विकी 'बिग बॉस'च्या घरात एकमेकांना सपोर्ट करत उत्तम खेळत इतर सदस्यांची कोंडी करताना दिसत आहेत. 3 / 8'बिग बॉस'च्या घरात येण्याआधी अंकिताच्या कपड्यांबद्दल चर्चा रंगली होती. अंकिता-विकीने 'बिग बॉस'साठी तब्बल २००-२५० आउटफिट खरेदी केल्याची चर्चा होती. 4 / 8पण, 'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. अंकिताच्या स्टाइलने आणि तिच्या कपड्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 5 / 8नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अंकिताने पिवळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने मॅचिंग ज्वेलरी घातली होती. 6 / 8पण लक्ष वेधून घेतलं ते तिच्या मंगळसूत्राने. अंकिताने काळे मणी आणि खड्याचं मंगळसूत्र घातलं होतं. 'बिग बॉस'च्या घरात अंकिता मंगळसूत्र फ्लॉन्ट करताना दिसून आली. 7 / 8अंकिताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोवंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 8 / 8'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' सिनेमात ती दिसली होती.