Join us  

PICS : ‘भाभीजी घर पर है’मधील मनमोहन तिवारींच्या लेकीला पाहिलंत का? सारा, जान्हवी सुद्धा तिच्यापुढे फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 8:00 AM

1 / 11
‘भाभीजी घर पर है’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. दीर्घकाळापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मालिकेतील विभूती, अंगूरी भाभी, अनिता भाभी आणि मनमोहन तिवारी यांना तर तुम्ही ओळखत असालच.
2 / 11
मनमोहन तिवारी गोरी मेम म्हणजेच अनिता भाभीवर लट्टू आहे. मनमोहन तिवारीची भूमिका रोहिताश गौर यांनी साकारली आहे.
3 / 11
याच रोहिताश गौर यांच्या लेकीला तुम्ही पाहिलं आहे का? त्यांची लेक कमालीची सुंदर आहे. आपल्या सौंदर्याने ती बड्या बड्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.
4 / 11
रोहिताश यांच्या लेकीचं नाव गीती गौर आहे. गीती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.
5 / 11
गीतीचं इन्स्टा अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. ती रोज नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6 / 11
वडिलांसारखाच गीतीला सुद्धा अभिनयात करिअर करायचं आहे आणि पेशाने ती मॉडेल आहे.
7 / 11
मॉडेलिंगच्या दुनियेत गीतीची एन्ट्री कधीच झाली आहे. अभिनेत्री होण्याचे सगळे गुण तिच्यात आहेत.
8 / 11
2019 मध्ये टाइम्स फ्रेश फेस स्पर्धेत ती सेकंड रनरअप होती. गीतीला डान्सिंगची आवड आहे.
9 / 11
गीतीने काही जाहिरातीत काम केलं आहे. लवकरच ती अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येईल, असं मानलं जात आहे.
10 / 11
लवकरच तिचा बॉलिवूड डेब्यू होणार असल्याचीही चर्चा आहे. एका मुलाखतीत खुद्द तिनेच ही माहिती दिली होती.
11 / 11
गीतीचं स्वत:चं युट्यूब चॅनलही आहे. यावर ती तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते.
टॅग्स :भाभीजी घर पर हैटेलिव्हिजनसेलिब्रिटी