Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न न करता 'बालिका वधु'मधली आनंदी बनली आई? आता स्वतः सांगितलं यामागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:20 IST

1 / 7
अभिनेत्री अविका गौर हिने लहान वयात बालिका वधु मालिकेतून स्वतःची ओळख आणि प्रसिद्धी मिळवली होती. कदाचित हे प्रत्येकाच्या नशीबात नसतं. बऱ्याच मोठ्या काळापर्यंत अभिनेत्री या मालिकेचा भाग होती.
2 / 7
बालिका वधु मालिकेनंतर ती ससुराल सिमर का मालिकेत रोलीच्या भूमिकेत झळकली होती. बऱ्याच रिपोर्ट्समध्ये दावा केला होता की, अविका लग्नाशिवाय एका बाळाची आई बनली आहे.
3 / 7
इतकेच नाही तर काही रिपोर्टमध्ये दावा केला गेला होता की, अविका तिच्यापेक्षा १८ वर्षे मोठ्या मनीष रायसिंघनला डेट करते आहे.
4 / 7
अविकाने मनीषसोबत ससुराल सिमर का मालिकेत काम केले होते. एका मुलाखतीदरम्याने तिने लग्नाशिवाय आई बनल्याच्या आणि मनीषला डेट करण्याच्या चर्चेवर भाष्य केले.
5 / 7
अभिनेत्रीने स्वतः या वृत्तामागचे सत्य सांगितले होते. अविका म्हणाली की, जेव्हा माझ्या अफेयरचे वृत्त आले तेव्हा मी शॉक्ड झाले होते. यादरम्यान मला आणि मनीषला वाटले की, कदाचित आपण असे काहीतरी करत असू ज्यामुळे अशाप्रकारची चर्चा होते आहे. यामुळे आम्ही सेटवर बोलणं बंद केले.
6 / 7
आम्ही एकमेकांमध्ये अंतर राखले पण या अफवा थांबवता आल्या नाहीत. त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोललो आणि ठरवले की आपण काहीही केले किंवा नाही केले, तरी गॉसिप होणारच. अविका म्हणाली की माझ्याबद्दल असे लिहिले गेले आहे की मला एक मूल आहे.
7 / 7
लोक अशा गोष्टी लिहिण्यापूर्वी विचारही करत नाहीत. माझे पालक अशा अफवांवर हसायचे. एके दिवशी माझे वडील सेटवर आले आणि त्यांनी मनीषला मला घरी सोडायला सांगितले. त्या काळात मला जाणवले की या बातम्या माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या नाहीत.
टॅग्स :अविका गौर