Join us  

प्री वेडिंग सोहळ्याचा आज शेवटचा दिवस, बच्चन कुटुंबीय कुठे आहेत? Photos आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 4:41 PM

1 / 8
देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानींच्या धाकट्या मुलाच्या प्री वेडिंग सोहळ्याची जगभरात चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये सुरु आहे. १ मार्चपासूनच सोहळ्याची सुरुवात झाली असून आज शेवटचा दिवस आहे.
2 / 8
१ मार्च रोजी पहिल्याच दिवशी हॉलिवूड स्टार गायिका रिहानाच्या पररफॉर्मन्सने चार चाँद लावले. रिहानासोबत सोहळ्याला आलेली सर्वच मंडळी थिरकली.
3 / 8
तर काल २ मार्चला जामनगरमधलं वातावरण बॉलिवूडमय झालं होतं. अख्खं बॉलिवूड अंबानींच्या पार्टीत अवतरलं होतं. रणबीर-आलिया, सैफ-करीना, स्टारकीड्स, तीनही खानसह अनेक कलाकारांनी सोहळ्यात रंगत आणली. शिवाय अंबानी दाम्पत्याने स्वत: डान्स करत सर्वांना आश्चर्यचकित केलं.
4 / 8
या दोनही दिवसात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि फॅमिली काही दिसलीच नव्हती. पण आता बच्चन कुटुंबीय जामनगरला पोहोचलं आहे. सोहळ्याचा शेवटच्या दिवशी Bachchans हजेरी लावणार आहेत.
5 / 8
अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन एका कारमधून कलिना विमानतळावर दाखल झाले. तर अभिषेक बच्चन, पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासह वेगळ्या कारमधून दाखल झाला. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकचं कुटुंब विशेषत: श्वेता बच्चन यांच्यात खटके उडाल्याचं चित्र आहे.
6 / 8
सोबतच संजय दत्त, अक्षय कुमार सुद्धा आजच्या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. सर्वच जामनगरमध्ये पोहोचले आहेत. अनंत अंबानींनी सुरु केलेल्या 'वनतारा' प्रोजेक्टलाही सर्वांनी भेट दिली.
7 / 8
दरम्यान आज शेवटच्या दिवशी सोहळ्यात काय काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अनेक सेलिब्रिटी मुंबईत परतले असून काही मात्र अजूनही जामनगरमध्येच आहेत.
8 / 8
श्रेया घोषाल, मोहित चौहान, शानसह काही गायक आज जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आज दिग्गज गायकांच्या आवाजाने जामनगर दुमदुमणार असं दिसतंय.
टॅग्स :मुकेश अंबानीअमिताभ बच्चनअभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडजामनगरगुजरात