Join us  

सुश्मिता सेन ते नागार्जुन! 'हे' ८ कलाकार आहेत हॉटेल व्यावसायिक; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांचे रेस्टॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 8:00 AM

1 / 9
सध्याच्या घडीला असे असंख्य कलाकार आहेत ज्यांनी कलाविश्वासह अन्य क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. यात अनेक कलाकार हॉटेल व्यावसायिक, बिझनेसमॅनदेखील आहेत. त्यामुळेच देशासह विदेशात रेस्टॉरंट चालवणारे सेलिब्रिटी कोणते ते पाहुयात.
2 / 9
अर्जुन रामपाल- बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अर्जुन रामपाल एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच रेस्टॉरंट मालकदेखील आहे. त्याचं दिल्लीत एक लक्झरी रेस्तराँ आहे. लॅप लॉज असं त्याच्या रेस्तराँचं नाव असून हे दिल्लीतील लोकप्रिय रेस्तराँ आहे.
3 / 9
सुनील शेट्टी - अभिनेता सुनील शेट्टी याचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. परंतु, त्याचे अनेक बिझनेस सुरु आहेत. मुंबईमध्ये त्याचं मिस शेफ डायनिंग हे रेस्तराँ आहे. या रेस्तराँमध्ये जेवणासोबतच ग्राहकांना वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेता येतो. तसंच सुनील शेट्टी काही क्लब व बारचाही मालक आहे.
4 / 9
सुश्मिता सेन - काही दिवसांपूर्वीच सुश्मिताची आर्या ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे सध्या सुश्मिता चर्चेत आहे. सुश्मिताचंदेखील एक रेस्टॉरंट आहे. मुंबईत बंगाकी मौसीज या नावाचं तिचं रेस्तराँ आहे. हे रेस्तराँ खासकरुन बंगाली फूडसाठी फेमस आहे.
5 / 9
बॉबी देओल - बॉबी देओलचे मुंबईत दोन रेस्टॉरंट आहेत. यात सम प्लस एल्स हे रेस्टॉरंट अंधेरीमध्ये आहे. या रेस्टॉरंटमध्ये इंडियन आणि चायनीज पदार्थ मिळतात. तर, दुसऱ्या रेस्टॉरंटचं नाव सुहाना आहे.
6 / 9
सोहेल खान - सोहेल खानचं रॉयल्टी क्लब हे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट पूर्वी शिल्पा शेट्टीच्या मालकीचं होतं. त्यानंतर आता सोहेल खान या रेस्टॉरंटचा मालक आहे. १० हजार स्क्वेअर फूट भागात हे रेस्टॉरंट उभं आहे. वन ऑफ दी बेस्ट इंटरनॅशनल नाइट क्लब्सच्या A यादीमध्ये रॉयल्टी क्लबचा समावेश आहे.
7 / 9
प्रियांका चोप्रा - देसी गर्ल प्रियांका चोप्राने विदेशात जाऊनही तिची भारतीय असल्याची आवड जोपासली आहे. प्रियांकाचं अमेरिकेत सोना नावाचं रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी भारतीय, पंजाबी अशा सर्व प्रकारचं भारतीय जेवण मिळतं.
8 / 9
नागार्जुन - दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन देखील एका हॉटेलचे मालक आहेत. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथे त्याचं N Grill & N Asian हे रेस्टॉरंट आहे. येथे इटालियन पदार्थ खासकरुन मिळतात.
9 / 9
डिनो मोरिया - डिनो मोरिया याची मुंबईत क्रिप स्टेशन नावाची कॅफेची चेन आहे. येथे युरोपियन पद्धतीचं जेवण मिळतं.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसुश्मिता सेनअर्जुन रामपालसोहेल खान