1 / 10सनीने 'जिस्म २’ चित्रपटातून' बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. बिग बॉसच्या ५ व्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती. 2 / 10नेहमीच सनी करिअर आणि खाजगी कारणांमुळे चर्चेत असते.सनीचा असाच किस्सा सध्या सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.सनीविषयीचा हा किस्सा सांगिताय एका कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यानेच. 3 / 10होय वाचून थोडं आश्चर्य नक्कीच वाटेल सनी आणि शेतकरी काय संबंध.एरव्ही हॉट फोटोंमुळे लक्ष वेधून घेणारे सनीचे फोटो सोशल मीडियावर तर सर्रास पाहयाला मिळतात. 4 / 10सनीच्या याच हॉट फोटोंंमुळे शेतकरी कर्जबाजारी होता होता वाचला. आंध्रप्रदेशमध्ये एका खेड्यात चैंचू रेड्डी नावाचा एक शेतकरी राहतो. १० एकर जमिनीत गेल्या कित्येक वर्षापासून शेती करत आहेत. मात्र हवे तसे उत्पन्न त्यांना मिळाले नव्हते.5 / 10लावलेला खर्च सुध्दा न निघाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे माेडले होते. शेतकरी कर्जबाजारी झाला होता. शेतात चोरीचे प्रकारही खूप वाढले होते. जे काही शेतात पिकायचे ते आजुबाजुच्या गावातली लोकं चोरुन न्यायचे. 6 / 10त्यामुळे शेतकरी पुर्ता बेहाल झाला होता.दिवसेंदिवस चोरीचे प्रकार वाढत होते.काहीही केले तर चोरीचे प्रकार कमी होत नव्हते आणि दिवसेंदिवस शेतकऱ्याचे आर्थिक अडचणीही वाढत होत्या.7 / 10शेतात पिकलेला मालाचा काहीच फायदा शेतकऱ्याला होत नव्हता.शेवटी अनोखी शक्कल लढवत त्याने थेट सनीच आता या संकटातून त्याला सोडवू शकते असा विश्वास त्याला होता.8 / 10तसे झालेही शेतकऱ्याने चक्क शनीचा सगळ्यात बोल्ड फोटोचे पोस्टर शेतात लावले. शेतात चोरीसाठी जो कोणी यायचा तो फोटोच बघत राहायचा.जागोजागी सनीचे पोस्टर शेतात लावण्यात आले. 9 / 10शेतात येणा-याचे लक्ष शेतावर कमी आणि त्या फोटोंवरच खिळून राहायचे. शेतकऱ्याने लढवलेल्या या आयडीयाच्या कल्पनेचा त्याला पुरेपुर फायदा झाला. शेतात चोरीचे प्रमाणही कमी झाले आणि शेतकरी कर्जबाजारी होता होता वाचला. 10 / 10कर्जबाजारी झालेला शेतकरी सनी मुळेच मालामाल झाला आणि ओढावलेल्या संकटातून कायमचीच सुटका मिळवली.