Join us  

Photos: लंडन ट्रीप अन् आईवडिलांची भांडणं, अमृता खानविलकरची मजेशीर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:19 PM

1 / 8
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या सौंदर्यावर, नृत्यावर आणि अभिनयावर चाहते फिदा आहेत. अमृताची 'लुटेरे' ही वेबसीरिज भलतीच गाजली. यातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. अमृता सोशल मीडियावर तर कायम अॅक्टिव्ह असते. तिच्या आईसोबतचे तिचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होतात. अमृता इतकी लोकप्रिय अभिनेत्री असली तरी घरात ती मध्यमवर्गीय मुलगी असते. तिच्या आईचा ओरडा खात असते. तिच्या आईचा साधेपणा प्रेक्षकांना खूप भावतो. नुकतंच अमृताने व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत आईवडिलांना लंडन ट्रीपवर नेलंय. चाहत्यांनी अमृताच्या आईलाच जास्त पाहिलं आहे. पण या लंडन ट्रीपमध्ये पहिल्यांदाच अमृताच्या वडिलांचीही झलक दिसली आहे. अमृताने लंडनमधील फोटो शेअर केलेत. आईवडिलांसोबत तिने सेल्फीही शेअर केलाय. ते दोघंही लेकीसोबत लंडनमध्येच फुल ऑन धमाल करत असल्याचं फोटोंमधून दिसून येतंय. दरम्यान या फोटोंसोबत अमृताने दिलेलं कॅप्शनही इंटरेस्टिंग आहे. आईवडिलांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरुन कशी भांडणं होतात आणि म्हातारपण कसं दुसरं बालपणच असतं याचा प्रत्यय तिला यातून आलाय. अमृता लिहिते,'एका विशिष्ट वयानंतर पालकांसोबत फिरणं म्हणजे लहान मुलांसोबत फिरण्यासारखंच असतं. त्यांना खायला काय हवं आहे हे सर्वात पहिलं प्राधान्य. नंतर त्यांच्यानुसार हळूहळू चालणं. त्यांचे फोटो, व्हिडिओ घेणं जेणेकरुन ते त्यांच्या मित्रांना दाखवू शकतील. यादी फार मोठी आहे.' ती पुढे लिहिते, 'आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही का?
2 / 8
अमृता सोशल मीडियावर तर कायम अॅक्टिव्ह असते. तिच्या आईसोबतचे तिचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होतात. अमृता इतकी लोकप्रिय अभिनेत्री असली तरी घरात ती मध्यमवर्गीय मुलगी असते. तिच्या आईचा ओरडा खात असते. तिच्या आईचा साधेपणा प्रेक्षकांना खूप भावतो.
3 / 8
नुकतंच अमृताने व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत आईवडिलांना लंडन ट्रीपवर नेलंय. चाहत्यांनी अमृताच्या आईलाच जास्त पाहिलं आहे. पण या लंडन ट्रीपमध्ये पहिल्यांदाच अमृताच्या वडिलांचीही झलक दिसली आहे.
4 / 8
अमृताने लंडनमधील फोटो शेअर केलेत. आईवडिलांसोबत तिने सेल्फीही शेअर केलाय. ते दोघंही लेकीसोबत लंडनमध्येच फुल ऑन धमाल करत असल्याचं फोटोंमधून दिसून येतंय.
5 / 8
दरम्यान या फोटोंसोबत अमृताने दिलेलं कॅप्शनही इंटरेस्टिंग आहे. आईवडिलांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरुन कशी भांडणं होतात आणि म्हातारपण कसं दुसरं बालपणच असतं याचा प्रत्यय तिला यातून आलाय.
6 / 8
अमृता लिहिते,'एका विशिष्ट वयानंतर पालकांसोबत फिरणं म्हणजे लहान मुलांसोबत फिरण्यासारखंच असतं. त्यांना खायला काय हवं आहे हे सर्वात पहिलं प्राधान्य. नंतर त्यांच्यानुसार हळूहळू चालणं. त्यांचे फोटो, व्हिडिओ घेणं जेणेकरुन ते त्यांच्या मित्रांना दाखवू शकतील. यादी फार मोठी आहे.'
7 / 8
ती पुढे लिहिते,'आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही का? माझ्या आईबाबांना तर एकटं सोडताच येत नाही कारण त्यांच्यात साध्या बिस्कीटावरुनही भांडण सुरु होतं. पहिल्या दिवशी आम्ही विमानतळावर ६ तास बसून होतो कारण आमचं चेक इन दुपारी ३ वाजता होतं. सगळं सामान घेऊन मी तीन मजले चढले. हो सगळं सामान आता मला यावरुन जज करु नका. चायना टाऊनमध्ये भात आणि व्हेजिटेबल ग्रेवी शोधत वेड्यासारखं भटकलो आहे. आता घरी येऊन अक्षरश: पडले आहे.'
8 / 8
अमृताची ही लंडन ट्रीप एकंदरच मस्त झालेली दिसतेय. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलंय. या वयात आईवडिलांना आपली सर्वात जास्त गरज असते. त्यांना वेळ देणं महत्वाचं असतं अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
टॅग्स :अमृता खानविलकरमराठी अभिनेताबॉलिवूडलंडनपरिवार