Join us  

IN PICS : आलिया आणि फक्त आलिया...! ठरली यावर्षीची ‘बिगेस्ट फिमेल स्टार’, पाहा तर...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 10:56 AM

1 / 8
2012 ते 2022 या उण्यापुऱ्या 9 वर्षात आलिया भटने मोठी मजल मारली आहे. आज आलिया बॉलिवूडची नंबर 1 स्टार आहे. अगदी चालू वर्षात एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमांनी बॉलिवूडकरांची चिंता वाढवली असताना एकट्या आलियानं कमाल केली.
2 / 8
होय, 2022 या वर्षात बॉलिवूडचे बडे बडे मेल सुपरस्टार्स फ्लॉप ठरले असताना आलियाने एकटीने चार हिट सिनेमे दिलेत. बॉलिवूड एक हिटची प्रतीक्षा करत असताना आलियाने एका पाठोपाठ एक हिट देत सर्वांची मनं जिंकलीत.
3 / 8
आलिया ही यंदाच्या वर्षातली बॉलिवूडची ‘बिगेस्ट स्टार ठरली’. 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी कितीही खराब गेलेलं असलं तरीही ते आलियासाठी मात्र लकी वर्ष ठरलं आहे. याच वर्षात तिचं लग्न झालं. याच वर्षात ती आई होणारचं भाग्य तिच्या नशीबी आलं. साहजिकच तिचा आनंद द्विगुणीत झाला नसेल तर नवल.
4 / 8
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर बॉलिवूड सावरत असतानाच तिचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा या वर्षातला पहिला सिनेमा रिलीज झाला. संजय लीला भन्साळींच्या या सिनेमात आलियानं दमदार भूमिका साकारली. या चित्रपटाने वर्ल्डवाईड 209.77 कोटींचा बिझनेस केला.
5 / 8
याच वर्षात एस.एस. राजमौलींच्या चित्रपटात आलिया झळकली. हा चित्रपट तर ब्लॉकबस्टर ठरला. सिनेमातील आलियाचा रोल छोटा होता. पण या छोट्या भूमिकेतही तिने जीव ओतला. या सिनेमाने ग्लोबली 1200 कोटींची कमाई करत इतिहास रचला.
6 / 8
याच वर्षात आलियाने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिची निर्मिती असलेला ‘डार्लिंग्स’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. काही तासांत या चित्रपटाला 24 मिलियन व्ह्युज मिळाले. सिनेमातील आलियाच्या कामाचंही अपार कौतुक झालं.
7 / 8
‘ब्रह्मास्त्र’ हा या वर्षातला आलियाचा चौथा सिनेमा. या चित्रपटानेही जादू केली. एकीकडे बॉयकॉट गँगने बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याचं अस्त्र उगारलं असताना तिच्या व रणबीरच्या या सिनेमानं 360 कोटींची कमाई करत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
8 / 8
या एकापाठोपाठ एक चार हिटनंतर एका वर्षामध्ये सर्वाधिक हिट देणारी फिमेल स्टार ठरली. लवकरच आलिया हॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘हार्ट आॅफ स्टोन’ हा तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा याचवर्षी रिलीज होतोय. हेही आलियाचं मोठ यश आहे.
टॅग्स :आलिया भटब्रह्मास्त्रबॉलिवूड