Join us  

अडीच महिने अंधाऱ्या घरात तेजस्विनीने काढले दिवस; लाईट बील भरायलाही नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:24 AM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 9
तेजस्विनी तिच्या अभिनयासह बेधडक वक्तव्य आणि स्पष्टवक्तेपणामुळेही कायम चर्चेत असते.
3 / 9
तेजस्विनी आज यश, प्रसिद्धी सारं काही उपभोगत आहे. मात्र, एक काळ असा होता जेव्हा तिला बराच स्ट्रगल करावा लागला होता.
4 / 9
एका मुलाखतीमध्ये तेजस्विनीने तिचा स्ट्रगल सांगितला होता. एकेकाळी तिच्याकडे लाईट बील भरायचेही पैसे नव्हते. त्यामुळे बरेच महिने ती लाईटशिवाय घरात रहात होती.
5 / 9
करिअरच्या सुरुवातीला मला बराच संघर्ष करावा लागला. जवळपास अडीच महिने माझ्या घरात लाईट नव्हते. लाइट बील भरलं नाही त्यामुळे माझे लाईट बंद केले होते. तो काळ खरंच खडतर होता, असं तेजस्विनी म्हणाली.
6 / 9
पुढे ती म्हणते, एक जाहिरात मी त्यावेळी केली होती. त्या जाहिरातीचे मला चांगले पैसे मिळाले. पैसे मिळाल्यावर सगळ्यात पहिले मी लाईट बील भरलं. ज्या दिवशी घरात लाईट आले तो दिवस मी विसरु शकणार नाही. एका अभिनेत्रीच्या घरात लाईट नसते तेव्हा लोक तुमच्याकडे, तुमच्या परिस्थितीकडे कसं पाहतात हे मी शब्दांत सांगू शकत नाही.
7 / 9
हा प्रसंग घडला तेव्हा माझं कळतं वय नव्हतं. पण लाईट आल्यावर मला वाटलं की आपण फार मॅच्युअर झालो आहोत. खडतर परिस्थितीवर मात करण्यासाठीचं पहिलं पाऊल आपण उचललं आहे. त्यानंतर मी थांबले नाही. मी काम करत राहिले आणि लोकांचं प्रेम मिळवून इथपर्यंत पोहोचले.
8 / 9
दरम्यान, तेजस्विनी आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने मालिका, सिनेमांसह, वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.
9 / 9
तु ही रे हा तिच्या सिनेमा विशेष गाजला. तसंच अनुराधा ही वेबसीरिज सुद्धा तिची लोकप्रिय ठरली.
टॅग्स :तेजस्विनी पंडितसेलिब्रिटीसिनेमावेबसीरिज