Join us  

Riva Arora : मी आत्तापर्यंत शांत होते पण..., वयावरून ट्रोल होणाऱ्या रिवा अरोराची आई संतापली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 5:08 PM

1 / 9
सोशल मीडिया सेन्सेशन रिवा अरोरा सध्या चांगलीच चर्चेत आहे. रिवाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात ती करण कुंद्रा व मिका सिंगसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसली. रिवा 12 वर्षांची आहे, असा दावा करत अनेकांनी हे व्हिडीओ पाहून तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
2 / 9
करण कुंद्रा आणि रिवाने अलिकडेच एका गाण्याचा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत 12 वर्षीय रिवा अरोरा करण कुंद्राबरोबर दिसत आहे. 12 वर्षाच्या रिवाने करण कुंद्रासोबत असा रोमॅन्टिक व्हिडीओ करणं लोकांना खटकलं. मग काय लोक भडकले.
3 / 9
करण कुंद्रा आणि रिवा दोघांनीही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं. अगदी तिच्या पालकांवरही लोकांनी टीका केली. 12 वर्षाच्या लेकीला इतके उत्तेजित कपडे घालण्याची व उत्तेजित भूमिका करण्याची परवानगी पालक देतातच कसे? असा सवाल अनेकांनी केला.
4 / 9
आता ट्रोलर्सला रिवाच्या आईने सडेतोड उत्तर दिलं आहे. रिवा अरोराच्या आईने एक स्ट्रोरी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ती स्टोरी रिवाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्येही शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये रिवाच्या आईने रिवाच्या वयाबद्दल पसरवण्यात येणाºया अफवांना पूर्णविराम दिला आहे.
5 / 9
मी आत्तापर्यंत शांत होते पण आता शांत बसणार नाही. माझ्या मुलीच्या वयाबद्दल केले जाणारे सर्व आरोप खोटे आहेत. चुकीच्या बातम्या सर्वात जास्त वेगाने पसरतात असं म्हटलं जातं आणि अनेक नामांकित सोशल मीडिया चॅनेलनं ते सिद्ध केलं आहे. हे सर्व माझ्यासाठी दु:खद आणि निराशाजनक आहे, असं रिवाच्या आईने म्हटलं आहे.
6 / 9
नामांकित सोशल मीडिया हँडल्सवरून अशा बातम्या पोस्ट करण्यापूर्वी तुम्ही मला संपर्क साधून खरं काय याची तपासणी करायला हवी होती. माझी मुलगी एक अभिनेत्री आहे आणि गेली अनेक वर्षे ती या क्षेत्रात कार्यरत आहे, असंही रिवाच्या आईने म्हटलं आहे.
7 / 9
माझी मुलगी रिवा सध्या 10 वीत आहे आणि गेल्या 13 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. तिने प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करून हे यश मिळवलं आहे, असंही तिच्या आईने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
8 / 9
रिवा अरोरा ही केवळ टेलिव्हिजन व बॉलिवूडमध्येच नाही तर सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 8.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. रिवाने ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात विकी कौशलच्या भाचीची भूमिका साकारली होती.
9 / 9
केवळ दीड वर्षांच्या वयात तिने पहिल्यांदा रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’मधून डेब्यू केला होता. श्रीदेवीसोबतच्या ‘मॉम’ या चित्रपटात ती झळकली होती. याशिवाय जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’ या सिनेमातही तिने काम केलं आहे.
टॅग्स :करण कुंद्रासेलिब्रिटी