Join us  

रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 5:31 PM

1 / 8
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली.
2 / 8
स्वत; आदित्य ठाकरे यांनी फोटो शेअर करत ही माहिती दिली, तसेच पुन्हा एकदा रजनीकांत मातोश्रीवर आल्याने आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटले. आदित्य यांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
3 / 8
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, ठाकरेंचा कठीण काळ सुरू असताना रजनीकांत यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतल्याने अनेक अर्थ काढले जात आहेत.
4 / 8
राज्याच्या राजकारणात शिवसेनेसाठी हा कठिण काळ सुरू आहे. अनेक जवळचे दूर निघून गेले. पण, मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब हयात नसतानाही रजनीकांत यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली.
5 / 8
रजनीकांत यांनी यापूर्वी २०१० मध्ये मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळीही, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकारे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंसमवेतच फोटो माध्यमांत आला होता.
6 / 8
आज तब्बल १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रजनीकांत मातोश्रीवर आले, यावेळीही सत्काराच फोटो काढण्यात आला. मात्र, यावेळीच्या फोटोत बाळासाहेबांची उणीव जाणवली. त्यामुळे, त्यांचा २०२४ मधील फोटो पुन्हा नजरेसमोर आलाय.
7 / 8
२०१० मध्ये रजनीकांत यांचा 'रोबोट' म्हणजेच तामीळ भाषेतला 'एंद्रीयन' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली होती.
8 / 8
दरम्यान, बाळासाहेबांच्या निधनानंतरही रजनीकांतने शोक व्यक्त करत संदेश लिहिला होता. बाळासाहेब हे माझ्यासह अनेकांना पितृतुल्य होते, असे रजनीने आपल्या शोकसंदेशात म्हटले होते.
टॅग्स :रजनीकांतबाळासाहेब ठाकरेमुंबईउद्धव ठाकरे