अभिनेता प्रतीक देशमुखने सुदेश भोसलेंच्या लेकीसोबत घेतले सातफेरे!, वेडिंग अल्बम आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:33 IST
1 / 9अभिनेता प्रतीक देशमुखने सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांची मुलगी श्रुती भोसले हिच्यासोबत सोमवारी, म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे.2 / 9प्रतीक देशमुख आणि श्रुती भोसले यांचा विवाहसोहळा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. 3 / 9या लग्नाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील श्रुती मराठे, तेजश्री प्रधान आणि गौरव घाटणेकर उपस्थित होते. अभिनेत्याच्या वरातीत ते नाचताना पाहायला मिळाले.4 / 9ऑक्टोबर महिन्यात घरच्यांच्या उपस्थितीत प्रतीक आणि श्रुतीचा साखरपुडा पार पडला होता. फोटो शेअर करत त्यांनी ही खूशखबर चाहत्यांना दिली होती.5 / 9अभिनेता प्रतीक देशमुखने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. यात त्याने १०, नोव्हेंबर, २०२५ असे लिहिले आहे.6 / 9लग्नात श्रुतीने लाल रंगाची साडी नेसली आहे. मिनिमल मेकअप, केसांचा आंबाडा, त्यावर गजरे, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर या गेटअपमध्ये वधू खूपच सुंदर दिसते आहे.7 / 9तर प्रतीकने बेज रंगाची हेवी वर्कची डिझाईन असलेली शेरवानी परिधान केली आहे. डोक्यावर फेटा बांधलेला अभिनेता वराच्या गेटअपमध्ये राजबिंडा दिसतो आहे.8 / 9प्रतीक देशमुखने शेअर केलेल्या या वेडिंग अल्बमला चाहत्यांची पसंती मिळत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 9 / 9प्रतीक देशमुख मराठी अभिनेता आहे. त्यानेृ 'शुभ लग्न सावधान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तो लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे.