Join us  

ना दसरा, ना दिवाळी! बॉलिवूडचे 'हे' सुपरस्टार कधीच साजरे करत नाहीत कोणते सणवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 1:03 PM

1 / 10
कलाविश्वात प्रत्येक सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक सिनेमा,मालिकांमध्येही हा उत्साह पाहायला मिळतो. परंतु, असं काही कलाकार आहेत जे कोणताच सण, उत्सव साजरा करत नाहीत.
2 / 10
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आज मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. परंतु, आमिर कधीच कोणते सण, उत्सव वा ईद असं काहीच साजरं करत नाही.
3 / 10
आमिरने सिनेमात बऱ्याचदा वेगवेगळे सण, उत्सव साजरे केले असतील. परंतु, खऱ्या आयुष्यात तो या सगळ्यापासून लांब राहतो.
4 / 10
बॉलिवूड अभिनेता महेश भट्ट यांच्या अनेक सिनेमांमध्ये दसरा, दिवाळी, होळी, ईद असे सण, उत्सव साजरे होताना पाहायला मिळाले आहेत. परंतु, खऱ्या आयुष्यात ते काहीही सेलिब्रेट करत नाहीत.
5 / 10
महेश भट्ट कधीच कोणता सण त्यांच्या कुटुंबियांसोबत सेलिब्रेट करत नाहीत.
6 / 10
नसीरुद्दीन शाह त्यांच्या सिनेमांसोबतच वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेत येत असतात.
7 / 10
नसीरुद्दीन शाह कधीच कोणते सण, उत्सव सेलिब्रेट करत नाहीत.
8 / 10
जावेद अख्तर यांच्या घरी अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्टीचं आयोजन केलं जातं. मात्र, ते कोणताही सण साजरा करत नाहीत.
9 / 10
अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या फिटनेसमुळे खासकरुन ओळखला जातो. परंतु, जॉन सुद्धा कोणतेच सण साजरे करत नाही.
10 / 10
जॉन सण, उत्सवांपासून लांब राहतो आणि त्याच्या कामावर जास्त फोकस करतो.
टॅग्स :बॉलिवूडआमिर खानजॉन अब्राहममहेश भटनसिरुद्दीन शाहसेलिब्रिटींची दिवाळी