Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:45 IST
1 / 10'कांटा लगा' या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाल्याचे बोलले जाते. सध्या पोलीस या शेफालीच्या मृत्यूचा तपास करत आहेत. 2 / 10रिपोर्टनुसार शेफालीला छातीत वेदना होऊ लागल्या, त्यानंतर तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागी याने तिला हॉस्पिटलला नेले परंतु वाटेतच तिचा जीव गेला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर रात्री १२.३० च्या सुमारास अंधेरीतील कूपर हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी नेण्यात आला.3 / 10शेफालीच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ४ लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पराग त्यागी याचा जबाबही पोलिसांनी घेतला आहे. शेफाली जरीवाला हिच्या निधनाच्या काही तास आधीच पराग त्यागीने त्याच्या इस्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली होती. जी अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर व्हायरल झाली4 / 10शेफारी जरीवाला ही बिगबॉस स्पर्धेतील स्पर्धक होती. याआधी आणखी २ स्पर्धकांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे. याआधीही २ कलाकारांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तेदेखील बिगबॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होते. 5 / 10२०२१ मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थ शुक्ला या अभिनेत्याचा मृत्यूही हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. बिग बॉस १३ सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला सहभागी होता. 6 / 10बिगबॉस स्पर्धेत सहभागी असणारी आणखी एक स्पर्धक सोनाली फोगाट हिचाही २०२२ मध्ये गोव्यातील हॉटेलमध्ये अचानक मृत्यू झाल्याचे पुढे आले. सुरुवातीला सोनालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर चित्र बदलले. 7 / 10सोनाली फोगाटच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला, सीबीआयदेखील या तपासात उतरली तेव्हा सोनालीचा मृत्यू तिला जबरदस्तीने ड्रग्स देऊन झाल्याचे समोर आले. या प्रकरणी तिचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर या दोघांना अटक करण्यात आली होती.8 / 10शेफाली जरीवालाच्या आधीही अनेक कलाकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. टीव्ही इंडस्ट्रीत रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचेही २०२१ साली याच कारणाने निधन झाले होते. 9 / 10बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके यांचेही एका कार्यक्रमावेळी अचानक निधन झाले होते. गायक केके यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले असं बोलले जाते. ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचेही २०१७ साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.10 / 10२०२३ साली बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचेही अचानक निधन झाले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असं बोलले गेले. परंतु कौशिक यांच्या मृत्यूबद्दलही अनेकांनी शंका उपस्थित केली. त्यात पोलिसांनी विविध अँगलने तपास केला होता.