Join us  

हळद लागली हो.... गौतमी आणि स्वानंदच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 2:15 PM

गौतमी आणि स्वानंदच्या हळदी समारंभाचे खास फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. 

गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांनी काही एकमेकांवरील प्रेमाची कबूल करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तेव्हापासून हे दोघेही चर्चेत आहेत. आता ही जोडी लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्यामुळे सर्वात जण फार उत्सुक आहेत. दोघांच्या घरी लग्नविधीला सुरुवात झालेली आहे. गौतमी आणि स्वानंदच्या हळदी समारंभाचे खास फोटो समोर आले आहेत. 

अभिनेता सारंग साठे आणि त्याची पत्नी पॉलाने सोशल मीडियावर गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदीचे फोटो शेअर केले.  “कुंकू हसलं, हळद पण हसली” असं कॅप्शन सांरगने फोटोला दिले. तर सारंगची पत्नी पॉलाने गौतमी-स्वानंदच्या जंगी हळदीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हळदी समारंभाच्या फोटोंमध्ये संपूर्ण देशपांडे आणि  तेंडुलकर कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे. 

हळदीच्या लुकमध्ये गौतमी आणि स्वानंद अगदी सुंदर दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुललेला दिसून येतोय. या फोटोंवर आणि व्हिडीओंवर चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा आणि आशीर्वादाचा वर्षाव केला आहे. हळदीचे फोटो समोर आल्यापासून त्यांच्या चाहत्यांना आता दोघांना नववधू आणि वराच्या वेशात पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

गौतमीच्या होणाऱ्या पतीचे नाव स्वानंद तेंडुलकर आहे . स्वानंद तेंडुलकर हादेखील अभिनेता आहे. तसेच मराठीमधलं डिजिटल चॅनेल ‘भाडिपा’चा बिझनेस हेड आहे.  स्वानंद आणि गौतमी बऱ्याच दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपुर्वी दोघांचे एका लग्नातील फोटो समोर आले होते. तेव्हाच  गौतमी आणि स्वानंदचं ठरतंय ही शंका चाहत्यांना आली होती. आता दोघेही लग्न करणार असल्याने त्याचे चाहते खुप उत्सुक आहेत. या कपलवर चाहते कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :गौतमी देशपांडेमृण्मयी देशपांडे मराठी अभिनेतासेलिब्रिटी