Join us  

बर्थडेनंतर समोर आले ऐश्वर्या रायचे पूल साइड पार्टीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 4:19 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने नुकताच ४८वा तिचा वाढदिवस साजरा केला.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती नवरा अभिषेक बच्चन आणि लेक आराध्यासोबत पूलच्या समोर बसलेली दिसते आहे. या दरम्यान ऐश्वर्या आणि तिचे कुटुंब पूल पार्टी थीमसाठी तयार असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे, माय-लेकीने मॅचिंग फ्लोरल क्राउनच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पोस्ट शेअर करत ऐश्वर्याने लिहिले की, Love you forever and beyond. यासोबतच तिने खूप इमोजीही शेअर केल्या आहेत. इतकेच नाही तर तिने आणखी फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिची आई वृंदा राय आणि लेकीला गळाभेट घेताना दिसत आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये ऐश्वर्याने लिहिले की, तुम्हाला खूप प्रेम, अगणित प्रार्थना आणि प्रेमसाठी आभारी आहे.

ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच ४८ वर्षांची झाली आहे. यावेळी बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात कतरिना कैफ, अनुष्का शर्मा आणि माधुरी दीक्षित यांच्यासारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

४ वर्षांनंतर ऐश्वर्या राय करणार कमबॅकऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर २०१८ साली फने खानमध्ये झळकली होती. आता ती चार वर्षानंतर मणिरत्नमच्या चित्रपटातून कमबॅक करते आहे. हा ऐतिहासिक चित्रपट असून मे किंवा जूनपर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात विक्रम, प्रकाश राज, जयम रवी, मोहन बाबू यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन