Join us

श्रेयस तळपदेने इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो; डोळयाला पट्टी पाहून चाहत्यांनी व्यक्त केली काळजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 17:35 IST

सध्या लॉकडाऊनमध्ये श्रेयस सुद्धा सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करत आहे. नुकताच त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या एका डोळ्याला बँडेड केल्यासारखी पट्टी दिसत आहे.

मराठी इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. तो सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. तो नेहमीच त्याच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना दिसतो. सध्या लॉकडाऊनमध्ये श्रेयस सुद्धा सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करत आहे. नुकताच त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या एका डोळ्याला बँडेड केल्यासारखी पट्टी दिसत आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोमुळे त्याचे सर्व चाहते काळजीत पडले आहेत.

श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या एका डोळ्याला पट्टी दिसत आहे. हा फोटो शेअर करताना श्रेयसनं लिहिलं, क्वारंटाईनचे इफेक्ट. मी चुकीच्या जागेवर मास्क लावलेला नाही. तुम्ही सांगू शकता का हे काय झालं असेल. श्रेयसच्या या फोटोवर त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहे. श्रेयसला काही दुखापत तर झाली नाही ना असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

मराठीनंतरबॉलिवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या  श्रेयसनं मराठी मालिकांमधून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. मराठी मालिका 'दामिनी' मधील त्याची भूमिका त्यावेळी प्रचंड गाजली आणि त्यानंतर त्याला यश मिळत गेलं. बॉलिवूडमध्ये इकबाल या सिनेमानं श्रेयसला स्वत:ची वेगळी ओळख मिळवून दिली. त्याच्या भूमिकेच खूप कौतुकही झालं. श्रेयस काही काळापूर्वी सेटर्स या सिनेमात दिसला होता.

टॅग्स :श्रेयस तळपदेबॉलिवूडमराठी