Join us

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच बिओन्सीने शेअर केला फोटो !

By admin | Updated: July 14, 2017 16:29 IST

अमेरिकेतील पॉपस्टार बिओन्सी हिने दोन मुलांची आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर फोटो शेअर केला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - अमेरिकेतील पॉपस्टार बिओन्सी हिने दोन मुलांची आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर फोटो शेअर केला. 
बिओन्सीने गेल्या महिन्यात दोन जुळ्यांना जन्म दिला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या दोन मुलांसह काढण्यात आलेला फोटो अपलोड केला आहे.
सर कार्टर आणि रुमी अशी तिच्या मुलांची नावे आहेत. सध्या तिने अपलोड केलेल्या या फोटोला खूप लाईक्स मिळत असून तिच्या चाहत्यांसह अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
(पॉपस्टार बिओन्सीच्या "त्या" फोटोला 6.33 मिलियन लाईक्स !)
(कॅटरिनाचा हॉट फोटो इन्स्टाग्रामवर)
(केटी पेरीनं इन्स्टाग्रामवर टाकला "काली" मातेचा फोटो, भारतीयांना राग अनावर)
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात 35 वर्षीय बिओन्सीने तिचा बेबी बम्प असलेला फोटो इन्टाग्रामवर अपलोड करत सर्वांना आई होणार असल्याची खूशखबर दिली होती. त्यावेळी तिने अपलोड केलेल्या फोटोला आतापर्यंत 6.33 मिलियन नेटिझन्सनी लाईक्स केले आहे. तर 3,34,000 हून अधिक जणांनी तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. यावेळी बिओन्सीने आमच्या कुटुंबात आणखी दोघांचे आगमन होणार असल्याने आम्ही खूप आनंदीत आहोत. आपण दिलेल्या शुभेच्छाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद, असे म्हणत इन्टाग्रामवर बेबी बम्प असलेला फोटो अपलोड केला होता. त्यावेळी या फोटोला अवघ्या एका तासात 2.43 मिलियन लाईक्स मिळाले आणि 1,66,000 प्रतिक्रिया आल्या होता. विशेष, म्हणजे गेल्यावर्षी म्हणजेच 2016 मध्ये इन्टाग्रामवर जगातील सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असलेली पॉपस्टार सेलेना गोमेझ हिच्या फोटोला सुद्धा बिओन्सीच्या त्या फोटोने मागे टाकले आहे होते. तर, सेलेना गोमेझने कोल्ड ड्रिंक पित असलेला तिचा फोटो इन्टाग्रामवर अपलोड केला होता. या फोटोला 6.3 मिलियन इतके लाईक्स मिळाले होते.