दि ग्दर्शक कबीर खानचा सलमान खान मुख्य भूमिकेत असलेला ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाला. त्याच्या यशाचे सर्वत्र सेलीब्रेशन सुरू असतानाच लगेचच त्याच्या आगामी ‘फँ टम’ चित्रपटाचे पोस्टर रिलिज केले आहे. या दहशतवादावर आधारित चित्रपटात सैफ अली खान आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कबीर खानने चित्रपटाचे पोस्टर टिष्ट्वटरवर प्रदर्शित केले आहे. साजिद नाडियादवालाच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत झालेला हा चित्रपट २६/११ च्या मुंबई हल्ल्यावर आधारित असल्याचे कळाले आहे. सेन्सॉर बोर्डातर्फे चित्रपटाला यू/ए सर्टिफिकेट मिळाले आहे. या फर्स्ट लूकमध्ये सैफ आणि कॅटरिनाचे डोळे बांधलेले दिसत आहेत आणि टॅगलाइन लिहिलेली आहे की, ‘ए स्टोरी यू विश वर ट्रू’ म्हणजे ‘एक कहाणी जी खरी असू शकते’. कॅटरिना दुसऱ्यांदा सैफ आणि कबीरसोबत काम करत आहे. तिने ‘रेस’मध्ये सैफसोबत काम केले आहे. तर ‘न्यूयॉर्क’ चित्रपटाच्या वेळी कबीरसोबत काम केले आहे. हुसैन जैदीची कादंबरी ‘मुंबई एव्हेंजर्स’ यावर आधारित हा चित्रपट २८ आॅगस्ट रोजी रिलिज होणार आहे.