Join us

पेटा रणवीरवर नाराज!

By admin | Updated: May 15, 2015 00:12 IST

सुपरस्टार रणवीर सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. रणवीरची टीव्हीवर झळकणारी नवीन जाहिरात यासाठी कारणीभूत आहे

सुपरस्टार रणवीर सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. रणवीरची टीव्हीवर झळकणारी नवीन जाहिरात यासाठी कारणीभूत आहे. ‘कुल हंक’ दिसण्यासाठी व कोणत्याही परिस्थितीत आराम का मामला दाखवणाऱ्या या जाहिरातीत रणवीरने चक्क शार्कबरोबर सामना केला आहे. मात्र प्राण्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘पेटा’ या संस्थेने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे रणवीर पुन्हा एकदा अडचणीत येण्याची चर्चा आहे.