Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीसीने फॅनला मारली चपराक!

By admin | Updated: December 25, 2015 02:06 IST

बोल्ड अँड ब्युटीफुल प्रियांका चोप्रा हिने ‘जय गंगाजल’ च्या ट्रेलर लाँचवेळी एक सिक्रेट शेअर केले. ती म्हणाली,‘अंजाना-अंजानी’ च्या सेटवर तिने एका फॅनला चपराक मारली होती.

बोल्ड अँड ब्युटीफुल प्रियांका चोप्रा हिने ‘जय गंगाजल’ च्या ट्रेलर लाँचवेळी एक सिक्रेट शेअर केले. ती म्हणाली,‘अंजाना-अंजानी’ च्या सेटवर तिने एका फॅनला चपराक मारली होती. एकदा एक फॅन माझ्यासोबत विचित्र प्रकारचे वर्तन करत होता. मला माहीत नाही, पण तो खरंच फॅन होता की फक्त...मी अंजाना अंजानीसाठी शूटिंग करत होते. तो आला आणि त्याने माझे हात पकडले. मी त्यांच्यासोबत फोटो काढायला नाही म्हणत नाही, पण कोणी शरीराला हात लावला तर मात्र, मला फार राग येतो. त्याने पुन्हा हात धरून फोटो घेण्यास आग्रह केला. मी खूप घाबरले, त्याची कॉलर पकडली आणि त्याला एक चपराक मारली. मी नंतर खूप घाबरले आणि तिथून पळून गेले.’