Join us  

'बॉलिवूडमध्ये स्त्रीच्या टॅलेंटपेक्षा शरीराला जास्त महत्त्व'; प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला इंडस्ट्रीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 11:13 AM

Payal ghosh: पायलने यापूर्वीही दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर गंभीर आरोप केले होते.यावेळी तिने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे पायल घोष (payal ghosh). समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होणारी पायल कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. काही काळापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्यावर गंभीर आरोप करुन ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिने थेट बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या पायलने अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये तिने साऊथ इंडस्ट्रीचं कौतुक करत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. 

"धन्यवाद देवा, मला साऊथ फिल्म इंडस्ट्रीने लॉन्च केलं. जर, बॉलिवूड इंडस्ट्रीने मला लॉन्च केलं असतं तर त्यांनी लॉन्च करण्यापूर्वीच माझे कपडे उतरवले असते. कारण, बॉलिवूडमध्ये टॅलेंटपेक्षा स्त्रीच्या शरीराला जास्त महत्त्व दिलं जातं", अशी पोस्ट पायलने केली होती.

दरम्यान, पायलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. पायल लवकरच 'फायर ऑफ लव्ह: रेड' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कृष्णा अभिषेक दिसणार आहे. 

टॅग्स :पायल घोषअनुराग कश्यपबॉलिवूडTollywood