Join us

पॉलाने केली प्रियांकाची प्रशंसा

By admin | Updated: June 19, 2016 03:53 IST

‘पिंडदान’ या रहस्यमय प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाची परदेशी, पण आता मराठी मातीत रंगलेली अभिनेत्री पॉला मॅगलम सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. या चित्रपटातील काही

‘पिंडदान’ या रहस्यमय प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाची परदेशी, पण आता मराठी मातीत रंगलेली अभिनेत्री पॉला मॅगलम सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. या चित्रपटातील काही गाणी गायिका प्रियांका बर्वे हिने गाऊन प्रेक्षकांच्या मनावर तिच्या आवाजाची जादू बिखेरली आहे. प्रियांकाने अनेक मराठी चित्रपटांसाठी आवाज तर दिला आहेच, पण सध्या तिचे ‘पिंडदान’मधील ‘कधी नि कसे’ हे गाणे प्रेक्षकांवर मोहिनी घालत आहे. पिंडदान ही एक रहस्यमय प्रेमकथा असल्याचे बोलले जाते अन् प्रेमकथा म्हटल्यावर आपसूकच रोमँटिक गाणी तर असणारच ना. तर या चित्रपटातील गाण्यांना मधुर आवाज देणाऱ्या प्रियांकाची प्रशंसा या चित्रपटाची अभिनेत्री पॉलाने केली आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन फुल स्विंगमध्ये सुरू असून, त्यामध्ये अभिनेत्यांसोबतच गायकदेखील सहभागी झाले आहेत. पिंडदान हे नाव लिहिलेले टी-शर्ट घालून सर्वच टीम जोरात प्रमोशन करीत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवर याबाबत पॉलाने पोस्ट शेअर केली असून, प्रियांकाचे तिने कौतुक केले आहे. पॉला म्हणतेय की, ‘पिंडदान प्रमोशन विथ द टॅलेंटेड प्रियांका बर्वे.’ आता प्रियांकाने ज्या अभिनेत्रीली आपला आवाज दिला, थेट तिच्याकडूनच प्रशंसा झाली म्हणजे विषयच संपला ना.