Join us

‘द पॅनिक डे’ची सातासमुद्रापार भरारी

By admin | Updated: August 25, 2016 02:23 IST

मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी रंगभूमीदेखील साता समुद्रापलीकडे पोहोचली आहे.

मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी रंगभूमीदेखील साता समुद्रापलीकडे पोहोचली आहे. आतापर्यत परदेशात अनेक मराठी नाटकांचे प्रयोग झाले आहेत. भारताच्या बाहेरही मराठी नाटके गाजत आहेत. आता ‘द पॅनिक डे’ हे नाटक इराणच्या कायरो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर होणार आहे. समाजात महिलांचे स्थान काय? महिलांना कशी वागणूक दिली जाते यांसारख्या प्रश्नांवर ‘द पॅनिक डे’ हे नाटक भाष्य करते. या नाटकात प्रमिती नरके एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या नाटकाला मिळालेल्या या यशामुळे ती सध्या खूप खूश आहे. ती सांगते, इराणमध्येदेखील स्त्रियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आता हे नाटक तिथे सादर होणार असल्यामुळे ही गंभीर समस्या तिथल्या प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे.