बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या आगामी चित्रपटात एका पहेलवानाची (:हेस्टलर) भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. आमिरचा ‘पीके’ हा चित्रपट 19 डिसेंबरला रिलीज होत आहे. सध्या त्याने एकही चित्रपट साईन केलेला नाही. तो 2क्15 मध्ये त्याच्या नव्या चित्रपटांमध्ये बिझी राहील. आमिरने नितेश तिवारींच्या एका चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळते. हा चित्रपट कुस्तीवर आधारित असणार आहे.
सूत्रंनुसार आमिरने या चित्रपटासाठी तयारीही
सुरू केली आहे. कुस्ती शिकण्यासाठी तो हरियाणाला जाणार आहे. त्याशिवाय सध्या तो त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष देऊन आहे. आमिर एक परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे पहेलवान दिसण्यासाठी आणि कुस्ती शिकण्यात तो जराही कसूर ठेवणार नाही अशी अपेक्षा आहे.