Join us  

"लोकांना वाटते तितके आम्ही जवळ..", सैफ अली खानच्या लेकासोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर बोलली पलक तिवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 2:02 PM

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.

श्वेता तिवारी(Shweta Tiwari)ची लाडकी मुलगी पलक तिवारी(Palak Tiwari)ने फार कमी कालावधीत सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. पलकचा ग्लॅमरस आणि सिझलिंग लूक सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. लवकरच  ती सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  पलक तिच्या अभिनय पदार्पणासोबतच सैफ अली खान(Saif Ali Khan)चा मुलगा इब्राहिम खान (Ibrahim Ali Khan) सोबतच्या रिलेशनशीपमुळे खूप चर्चेत आहे.

एका मुलाखतीत पलकने तिच्या आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबतच्या नात्याच्या अफवांवर मौन सोडले.  सिद्धार्थ काननला दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा पलकला विचारण्यात आले - 'तुझ्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर इब्राहिम अली खानची प्रतिक्रिया काय होती, तो ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक होता का?

यावर पलक म्हणाली- 'आम्ही कपल आहोत, हे खरं नाही. मी एक चित्रपट करत आहे हे त्याला माहीत होते, पण त्याने त्याबद्दल काही विशेष सांगितले नाही. आम्ही जास्त करुन तेव्हाच भेटतो जेव्हा गेटूगेदर असते. आम्ही मित्र आहोत, पण लोक वाटतात तितके जवळचे मित्र नाही.

 

टॅग्स :पलक तिवारीइब्राहिम अली खान