Join us  

लेक पलकला डेटींगपासून दूर ठेवण्यासाठी श्वेता तिवारी लढवायची ही अनोखी शक्कल, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 3:30 PM

पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानच्या अफेअरच्या चर्चा आहेत.

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी श्वेता तिवारीची लेक आणि अभिनेत्री पलक सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानच्या अफेअरच्या चर्चा आहेत.

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान इव्हेंटमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर दोघेही नुकतेच चित्रपट पाहण्यासाठी आले होते. मात्र यादरम्यान दोघेही वेगळे दिसले. आता या सगळ्यामुळे पलक तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पलक तिवारीची मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत पलक तिवारी अनेक खुलासे केलेत. 

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांच्या अफेअरच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, पलक तिवारीची एक मुलाखत समोर आली आहे, या मुलाखतीदरम्यान पलक तिवारीने असा खुलासा केला आहे, जो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. पलक तिवारीने बॉलिवूड बबलशी संवाद साधताना सांगितले की, 'मी लहान असताना खूप खोटं बोलायचे. पण माझी आई काही वेळात माझे खोटे पकडायची. शाळेत असताना माझा एक बॉयफ्रेंड होता, मी माझ्या आईशी खोटे बोलायचो आणि त्याच्यासोबत मॉलमध्ये जायचो. आईला हे कळल्यावर तिला खूप राग आला. पलक तिवारीने सांगितले की, तिची आई एकदा म्हणाली होती की, 'मी तुझे केस कापून तुला गावी पाठवते'. यानंतर पलक तिवारीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'मी लहान असताना माझ्या आईने मला कुरूप बनवण्यासाठी माझे केस कापले. जेणेकरून मी कोणाला डेट करू नये. 

टॅग्स :पलक तिवारीश्वेता तिवारी