Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या या अभिनेत्री, मॉडेल्सनेही मागितली होती सुरक्षा

By admin | Updated: July 22, 2016 02:02 IST

कंदीलच काय, तर पाकिस्तानमध्ये हॉट आणि बोल्ड वर्तणुकीमुळे अनेक अभिनेत्री व मॉडेलविरोधात फतवे काढण्यात आलेले आहेत.

कंदील बलोच हिच्या हत्येची सध्या सर्वत्रच चर्चा होत आहे, परंतु कंदीलच काय, तर पाकिस्तानमध्ये हॉट आणि बोल्ड वर्तणुकीमुळे अनेक अभिनेत्री व मॉडेलविरोधात फतवे काढण्यात आलेले आहेत. गृहमंत्रालयाकडे मागणी करणारी कंदील ही पहिली अभिनेत्री नाही. इतर मॉडेलनेही कंदीलप्रमाणेच जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करून सुरक्षेची मागणी केली होती. कोण आहेत या मॉडेल आणि का त्यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला, त्यावर एक नजर ...>हुमैमा मलिक : ‘राजा नटवरवाल’ या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत या अभिनेत्रीने अनेक प्रकारचे किसिंग सीन दिले आहेत. त्यामुळे हुमैमाविरोधात फतवा काढण्यात आला होता. तिने अनेक वेळा तिच्या जिवाला धोका असल्याचे मीडियाद्वारे सांगितले आहे. हुमैमा पाकिस्तानमधील टॉप मॉडेल व सर्वांत महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.>अर्शी खान :प्रसिद्ध मॉडेल अर्शी खानच्या हॉट फोटोमुळे तिच्या विरोधातही फतवा निघाला होता. ती क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीसोबतच्या संबंधामुळेसुद्धा चर्चेत राहिलेली आहे.>वीणा मलिक : पाकिस्तानी अभिनेत्री व मॉडेल वीणा मलिक आपल्या बेधडक वक्तव्य व फोटो सेशनसाठी नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे तिला जिवे मारण्याच्या धमक्या अनेक वेळा आल्या आहेत. तिने पाकिस्तान सरकारकडे सुरक्षेची मागणीसुद्धा केली आहे. उर्दू, पंजाबी, तेलगू चित्रपटांसह वीणाने बॉलीवूडमधील ‘गली गली में चोर है’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘सुपर मॉडेल,’ ‘मुंबई १२५ किमी ३ डी,’ ‘मि. मनी’ या चित्रपटांत काम केलेले आहे. तसेच, बिग बॉसमध्येही ती झळकली होती.>मीरा :पाकिस्तानमधील ‘नजर बुलाया’ या प्रसिद्ध चित्रपटाची अभिनेत्री मीराविरोधात फतवा काढण्यात आलेला आहे. मीरा ही कायम वादात राहिलेली आहे. तिची बॉलीवूड एंट्रीही वादग्रस्तच होती. दोन पासपोर्ट बाळगणे, मालमत्ता, लग्नाचा बनाव अशा अनेक गुन्ह्यांत अडकल्यामुळे ती चर्चेत आहे.