पाकिस्तानी अभिनेत्री हुमेरा असगर हिच्या अकाली मृत्यूने अनेकांना धक्का दिला होता. हुमेराचा मृतदेह तिच्या राहत्या खोलीत आढळला होता. आता हुमेराची अखेरची व्हॉईस नोट समोर आली आहे. ही व्हॉईस नोट अत्यंत भावूक करणारी आहे. हुमेराने तिच्या मृत्यूपूर्वी ही Voice Note तिच्या मित्रांना पाठवली होती. यात तिने मला 'दुआ में जरुर याद रखना' असं म्हटलं होते.
हुमेरा असगरचे शेवटचे शब्द
या व्हॉईस नोटमध्ये म्हटलंय की, मला माफ करा, मी ट्रॅव्हल करत होती. इकडे तिकडे जात आहे. मी आनंदी आहे, तुम्ही मक्कामध्ये आहात. माझ्यासाठी खूप सर्वांनी प्लीज, तुमच्या क्यूट मैत्रिणीसाठी, बहिणीसाठी मनापासून प्रार्थना करा. माझ्या करिअरसाठी दुआ में जरूर याद रखना, माझ्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे असं तिने म्हटले होते.
काय घडले होते?
पाकिस्तानी अभिनेत्री हुमेरा असगरचा मृतदेह तिच्या कराची येथील राहत्या घरी सापडला होता. तिच्या खोलीतून दुर्गंध येत होता त्यामुळे आसपासच्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. रिपोर्टनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये हुमेराचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून तिचा मृतदेह खोलीतच सडत होता. पोलिसांनी जेव्हा हुमेरा असगरच्या घराचा दरवाजा ठोठावला परंतु कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा समोरील दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला.
या बंद खोलीत अभिनेत्री हुमेरा असगरचा मृतदेह अक्षरश: सडलेल्या अवस्थेत होता. त्या मृतदेहाला किडे लागले होते. मृतदेह ओळखणेही कठीण होते. पोलिसांनी तिथे फोन आणि सामान पाहिले तेव्हा अभिनेत्रीची ओळख पटली. अभिनेत्री हुमेराचा मृतदेह स्वीकारण्यास तिच्या घरच्यांनी नकार दिला. आमचे तिच्याशी काही देणंघेणं नाही असं हुमेराचे वडील म्हणाले. हुमेराने खूप आधीच घरच्यांसोबत नाते तोडले होते. त्यामुळे तिच्या मृतदेहासोबत तुम्हाला काय करायचे ते करा असं तिच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले.