Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त अभिनयाकडे लक्ष देणार जिम्मी

By admin | Updated: November 6, 2014 02:29 IST

एका वेळी एकच काम करायला हवे, असे अभिनेता आणि निर्माता जिम्मी शेरगीलचे मत आहे. त्यामुळे आता फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचे त्याने ठरवले आहे

एका वेळी एकच काम करायला हवे, असे अभिनेता आणि निर्माता जिम्मी शेरगीलचे मत आहे. त्यामुळे आता फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचे त्याने ठरवले आहे. जिम्मीने निर्माता म्हणून धरती (२०११) या पहिल्या पंजाबी चित्रपटाची निर्मिती केली होती. सव्वाचार कोटींचा खर्च लागलेल्या या चित्रपटाने साडेसात कोटींची कमाई केली होती. सध्या जिम्मी ‘गन पे डन’ च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. जिम्मीने सांगितले, ‘सध्या मला अभिनयाकडे लक्ष द्यायचे आहे. चित्रपट निर्मितीत हात आजमावले आहेत. त्या कामी पूर्ण वेळ द्यावा लागतो. सध्या मी यातून ब्रेक घेतला आहे. कारण आता मला अभिनयाकडे लक्ष द्यायचे आहे. जिम्मी ‘गन पे डन’ या चित्रपटात दिवंगत अभिनेते फिरोज खान यांच्या चाहत्याच्या भूमिकेत आहे. या भूमिकेबाबत जिम्मी सांगतो की, ‘माझी भूमिका स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका अभिनेत्याची आहे. तो अभिनेता स्वत:ला फिरोज खान यांची नक्कल करण्यात अव्वल मानत असतो.’