Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा,शाहरुख खानला पाहून ढसाढसा रडला चाहता, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 18:17 IST

चाहत्यांच्या गराड्यात फसलेल्या शाहरूखनेही या चाहत्याला एक फोटो दिल्याने त्याच्या या जबरा फॅनचं मन नक्कीच जिंकलं असेल हे मात्र नक्की.

जिथे सेलिब्रेटी जातात तिथे तिथे चाहत्यांचा गराडा झालाच समजा. अनेकदा सेलिब्रेटी चाहते फोटोसाठी जबरदस्ती करत फोटो काढत असल्याचेही आपण पाहिले आहे. जेव्हा शाहरूख सलमान सारखे सुरस्टार असतात तेव्हा तर विचारच न केलेला बरा. रोमान्सचा बादशाह आणि बॉलीवुडचा किंग शाहरुख खानचे कित्येक फॅन्स आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात शाहरुखचे फॅन्स पसरलेत. त्याच्या प्रत्येक फॅन्सची काही ना काही खास बात असते. असाच एका शाहरूखच्या जबरा फॅनचा व्हिडीओ समोर आला आहे. यात शाहरूखला पाहून या चाहत्याला रडूच कोसळल्याचे पाहायला मिळते आहे. रडत - रडत तो एक फोटो काढता यावा यासाठीही प्रयत्न करताना दिसतोय. चाहत्यांच्या गराड्यात फसलेल्या शाहरूखनेही या चाहत्याला एक फोटो दिल्याने त्याच्या या जबरा फॅनचं मन नक्कीच जिंकलं असेल हे मात्र नक्की.

काही दिवसांपूर्वी अगदी निरागस आणि लहान असणा-या या फॅनने किंग खानकडे ट्विटरवरुन फोन नंबरची मागणी केली. आता सोशल मीडियावर कुणी फोन नंबर मागत असेल तर त्याला सेलिब्रिटी त्याला काय उत्तर देतील. मात्र शाहरुखने या चिमुकल्या आणि जबरा फॅनला दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

'हा नक्की पाठवतो माझा नंबर आणि माझं आधार कार्डही पाठवू का ?' अशा शब्दांत शाहरुखने आपल्या जबरा फॅनला उत्तर दिलं. किंग खानच्या उत्तराने हा जबरा फॅन भलताच खुश झाला. त्यानं शाहरुखच्या ट्विटला रिप्लाय दिला आणि म्हटलं की, मला नंबरही नको आहे आणि आधार कार्डसुद्धा नको आहे. मला तर फक्त तुझ्याकडून एक जादू की झप्पी हवी आहे. हा रिप्लाय पाहून शाहरुखनेही उत्तर दिलं की का नाही लगेच पाठवतो. शाहरुखच्या या उत्तराने चाहता भलताच खुश झाला होता. 

टॅग्स :शाहरुख खान