Join us

ओम पुरी यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

By admin | Updated: January 6, 2017 10:15 IST

बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते 66 वर्षांचे होते.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते 66 वर्षांचे होते. ओम पुरी यांनी समांतर सिनेमांपासून ते व्यावसायिक सिनेमांमध्येही काम करुन यशदेखील मिळवले.   

ओम पुरी यांनी हॉलिवूडमध्येही काम केले आहे. बॉलिवूडव्यतिरिक्त ब्रिटन आणि अमेरिकेतील सिनेमांमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला, आणि प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली.  
 
ओम पुरी यांचा जन्म अंबालामधील एका पंजाबी कुटुंबात झाला होता. पतियाला येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करुन 1976 साली पुण्यातील एफटीआयआयमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे घेतले.  
(ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन)
 
यानंतर 1993 मध्ये ओम पुरी यांचे नंदिता यांच्यासोबत विवाहबंधनात बांधले गेले. मात्र या दोघांच्या नात्यात कटुता आल्याने 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.  
 
ओम पुरी यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड दुःखात बुडाला आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गजांनी ओम पुरी यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.