Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या दिवशी आलियाची दिलदारी, दोन ड्रायव्हरला केली 50 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 12:32 IST

आलियाने वयाच्या 19 व्या वर्षी 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आणि पहिल्याच सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने तिने रसिकांची मने जिंकली.

आज आलिया भटला बॉलीवुडची यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. तरुणाईची दिल की धडकन बनलेली आलियाचं  मन ही आभाळाएवढं मोठं आहे. नुकतेच तिने तिचा 26 वा वाढदिवस साजरा केला. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिने सर्व सिनेमाच्या क्रु मेंबरसह मोठ्या आनंदात केक कटींग करत सेलिब्रेट केल्याचे पाहायला मिळाले. पण आलियाचे वाढदिवस सेलिब्रेशन इथवरचं थांबल नसून तिनं तिच्या वाढिदवसाच्या दिवशी दिलदारी दाखवलीय. आलियाने वाढदिवसाच्या दिवशी तिच्या दोन्ही ड्रायव्हरला चक्क 5० -50 लाखांचा चेक भेट म्हणून दिला आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपला आनंद स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता दुस-यांपर्यंत वाटाला. नक्कीच आलियाची ही कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल. दोघेही गाडी चालकांनी मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घ्यावे अशी आलियाची इच्छा होती. म्हणूनच आलियाने दिलेली रक्कम ही त्यांना मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी मदत केल्याचे माहिती समोर येत आहे. 

आलियाने वयाच्या 19 व्या वर्षी 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आणि पहिल्याच सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने तिने रसिकांची मने जिंकली. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अशा भट कुटुंबातून आलेल्या आलियाने एकाहून एक सरस भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली. 'हायवे', 'टू स्टेट्स', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ, 'शानदार', 'उडता पंजाब', 'डिअर जिंदगी', 'बद्रीनाथ की दुल्हनियाँ' या आणि अशा विविध सिनेमात आलियाने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. सिनेमात विविध भूमिकांसाठी विविध स्टायलिश अंदाज धारण करणारी आलिया रिअल लाईफमध्येही तितकीच स्टायलिश आहे.  

टॅग्स :आलिया भट