Join us  

VIDEO : Nusrat Jahan ने शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ, सोबत दिसला कथित बॉयफ्रेन्ड यश दासगुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 12:45 PM

Nusrat Jahan : पती निखील जैनपासून वेगळी झाल्यानंतर नुसरत जहांचं नाव यश दासगुप्तासोबत जोडलं जात आहे. अभिनेत्री कधीही अधिकृतपणे याबाबत काही सांगितलं नाही.

लोकप्रिय बंगाली अभिनेत्री  आणि टीएमसी खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) जेव्हापासून प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू होती तेव्हापासून बाळाचा पिता कोण याबाबत लोक विचारत आहेत. पण नुसरतने एकदाही याप्रकरणी कुणाचाही उल्लेख केला नाही. पण तिचं नाव बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबत (Yash Dasgupta)  जोडलं जात आहे. अशाच अभिनेत्रीने एका व्हिडीओ शेअर केलाय जो बघून तिचे फॅन्स आनंदात आहेत. 

पती निखील जैनपासून वेगळी झाल्यानंतर नुसरत जहांचं नाव यश दासगुप्तासोबत जोडलं जात आहे. अभिनेत्री कधीही अधिकृतपणे याबाबत काही सांगितलं नाही. यशही सतत नुसरतसोबत दिसला आहे. इतकंच काय तर प्रेग्नेसी दरम्यानही यशने नुसरतला एकटं सोडलं नाही. इतकंच नाही तर नुसरतला मुलगा झाल्याची आनंदाची बातमीही स्वत: यश दासगुप्तानेच दिली होती. मात्र, आता असं दिसतंय की, नुसरत त्यांच्या या नात्याबाबत मोकळेपणाने सांगायचं आहे. असं तिच्या या इन्स्टाग्राम पोस्टवरून वाटतं.

नुसरतने नुकताच एक फॅनमेड व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. हा व्हिडीओ पाहून असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, बंगाली अभिनेता यशसोबत आपलं नातं सार्वजनिक करत त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. नुसरतच्या या व्हिडीओत तिने स्वत:ला आणि यशला मुलगा झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फॅनपेजवर हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, 'यीशानच्या जन्मासाठी यशरतला शुभेच्छा. आम्हाला अजून बाळाची एक झलक मिळालेली नाही त्यामुळे मी तुम्हा दोघांसाठी हा छोटासा व्हिडीओ बनवला आहे. नुसरतच्या फॅनकडून यीशानला खूप सारं प्रेम'. 

टॅग्स :नुसरत जहाँसोशल मीडिया