Join us  

नुसरत भरुचाने नाकारली १ कोटीची आॅफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 7:44 AM

चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचा हिला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी एका दिग्दर्शकाने १ कोटींची आॅफर दिली होती, मात्र तिनं ती नाकारली आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ चित्रपटानं तिला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटातून दमदार अभिनय करत घराघरांत पोहोचलेली नुसरत भरुचा हिला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी एका दिग्दर्शकाने १ कोटींची आॅफर दिली होती, मात्र तिनं ती नाकारली आहे.

नुसरतच्या वाट्याला सध्या बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट नाही. ‘सोनू के टिट्टू की स्वीटी’ या कमी बजेट असणाऱ्या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला होता. यात नुसरतच्या कामाचे खूपच कौतुक झालं. तिचे काम पाहून तिला एका दिग्दर्शकांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी १ कोटींची आॅफर देऊ केली होती. मात्र तिनं ही आॅफर नाकारली आहे.

माझ्या मते पैसा महत्त्वाचा नसतो, तुम्ही नेहमी चांगल्या कामाच्या शोधात असलं पाहिजे. गुणवत्तेवर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे असं नुसरतचं मत आहे म्हणूनच तिनं ही आॅफर नाकारली आहे. जर कथा चांगली असेल तर आपण नक्कीच प्रादेशिक चित्रपटात काम करू, अभिनेत्री म्हणून एखादी भूमिका मला भावली पाहिजे ती भूमिका आव्हानात्मक असली पाहिजे, माझ्यासाठी काम करताना पैशांपेक्षा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत.’