Join us  

एनटीआर बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 9:59 AM

सुपरस्टार एन.टी.रामाराव यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएनटीआर यांचा चित्रपटसृष्टीपासून राजकारणापर्यंतचा प्रवास विद्या बालनचे तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण

सुपरस्टार एन.टी.रामाराव यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये विद्या बालन, राणा दुग्गाबत्ती व सुमंथा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीन वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये एनटीआर यांचा चित्रपटसृष्टीपासून राजकारणापर्यंतचा प्रवास पाहायला मिळत आहे.

या ट्रेलरमध्ये अभिनेत्री विद्या बालनची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून विद्या तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याने तिच्या चाहत्यांसाठी हा ट्रेलर आणि चित्रपट अधिक खास असणार आहे. विद्याशिवाय नंदामुरी बालाक्रिष्णा आणि राणा दग्गुबत्ती या कलाकारांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

विद्या पहिल्यांदा तेलगू सिनेमात काम करत असून तिचा या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूप चांगला असल्याचे तिने सांगितले. एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. विद्याने सांगितले की, दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाबाबत मी खूप उत्साही आहे. हा माझा पहिला तेलगू सिनेमा आहे. या चित्रपटाबाबत मी खूप उत्सुक आहे कारण मी कधीच इतर भाषेत संवाद बोलले नव्हते. मल्याळम चित्रपटात मी छोटा रोल केला होता. मात्र एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमधील माझी भूमिका मोठी आहे.

 'एनटीआर बायोपिक' हा २ भागात प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे. पहिल्या भागाचे शीर्षक 'कथानायकुडू' असून दुसऱ्या भागाचे 'महानायकुडू' असे शीर्षक आहे. राजकारणासोबतच अभिनयातही नाव कमवलेले एनटीआर यांच्या जीवनप्रवासावर आधारित हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाकृष्णा, विष्णू वर्धन आणि साई कोरापटी करणार असून निर्माते क्रिश आहेत. हा चित्रपट ९ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

टॅग्स :एन.टी.आर. बायोपिकविद्या बालन