बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानलाही आता ‘धूम’ सिरीजच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. यशराज बॅनरच्या धूम सिरीजमध्ये खलनायकाची मुख्य भूमिका असते. धूममध्ये जॉन अब्राहम, धूम-२ मध्ये हृतिक रोशन आणि धूम-३ मध्ये आमिर खानने खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. शाहरुखलाही धूम सिरीजच्या चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. त्याने सांगितले, ‘मी सध्या यशराज बॅनरच्या फॅन या चित्रपटात काम करीत आहे. संधी मिळाली तर धूम सिरीजच्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल. मला हे चित्रपट आवडले; पण आदित्य चोप्राने मात्र कधीही माझ्या समोर धूमचा प्रस्ताव ठेवलेला नाही.’
आता शाहरुखलाही करायचाय ‘धूम’
By admin | Updated: November 5, 2014 00:37 IST