Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘किक’चा सिक्वल

By admin | Updated: August 13, 2014 23:04 IST

किक’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल बनावा अशी ‘दबंग’ खान सलमानची इच्छा आहे.

‘किक’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल बनावा अशी ‘दबंग’ खान सलमानची इच्छा आहे. यापूर्वी सलमानच्या ‘दबंग’चा सिक्वल रिलीज झाला असून त्याच्या नो एंट्री या चित्रपटाचा सिक्वलही बनवला जाणार आहे. ‘किक’च्या यशाने सलमान उत्साहित असून या चित्रपटाचा सिक्वल बनवला जावा अशी त्याची इच्छा आहे. ‘किक’चा निर्माता दिग्दर्शक असलेल्या साजीद नडियादवालाच्या निकटवर्तीय सूत्रांनुसार ‘किक’ सुपरहिट ठरेल याची सलमानला कल्पना नव्हती; पण हा चित्रपट सलमानच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला. सलमानच्या मते त्याचे या चित्रपटातील डेविल हे सर्वोत्कृष्ट पात्र असून हे पात्र आणखी एखाद्या चित्रपटात वापरता येईल. त्याने त्याची इच्छा साजिद नडियादवालाला सांगितली आहे.