Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतक्यात लग्न नाही

By admin | Updated: July 27, 2015 02:08 IST

र णबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या नात्याबद्दल काही वेगळे सांगण्याची गरज नाही. नुकतेच त्या दोघांनी साखरपुडा केल्याचे समजले. परंतु,

र णबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या नात्याबद्दल काही वेगळे सांगण्याची गरज नाही. नुकतेच त्या दोघांनी साखरपुडा केल्याचे समजले. परंतु, कतरिनाने या सर्व बाबींना नकार दिला आहे. तिने स्पष्ट सांगितले की, रणबीरसोबत माझा साखरपुडा झालेला नाही आणि इतर सर्व चर्चा या अफवा आहेत. एवढ्या लवकर मी लग्न करणार नाही. एका मुलाखती दरम्यान ती म्हणाली, ‘माझा साखरपुडा झालेला नाही. पण, मला माहित आहे की, तुम्हाला सर्वांना वाटते की, मी लग्न करायला हवं. पण सध्यातरी तसे काही नाही. त्यामुळे काही दिवसांसाठी मला मोकळं सोडा मी आत्ताच लग्न करणार नाही. ‘फँटम’ चित्रपटात ती सैफ अली खानसोबत मुख्य भूमिकेत आहे. १६ जुलै रोजी तिच्या बर्थडेलाच साखरपुडा झाल्याची चर्चा सिने वर्तृळात रंगली होती.