Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा फोटो पाहून नेटिझन्सने केले कुत्र्याचे कौतुक... वाचा भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 14:30 IST

शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान असून त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रणबीर कपूरने देखील खूपच कमी वयात त्याचे एक प्रस्थ निर्माण केले

ठळक मुद्देएका युजरने म्हटले आहे की, अरे वा... हा कुत्रा किती सुंदर दिसतोय तर एका नेटिझन्सने तर चक्क कुत्र्याला स्टार म्हटले आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, सर्वात मोठा स्टार शाहरुख आणि रणबीरच्या मध्ये उभा आहे तर एकाने कुत्राच भाव खावून गेला अशी कमेंट केलीय.

तुम्ही तुमचा मस्त फोटो काढला असेल, त्या फोटोत तुम्ही खूपच सुंदर दिसत असाल... पण या फोटोत उगाचच शिरून हा फोटो कोणी खराब केला असेल तर... असंच काहीसे शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांच्यासोबत झाले आहे. पण या फोटोत असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीला सोशल मीडियावर त्यांच्यापेक्षा खूप चांगल्या कमेंट मिळत आहेत.

शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान असून त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रणबीर कपूरने देखील खूपच कमी वयात त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्या दोघांना एकत्र पाहायला कोणाला नाही आवडणार... त्यांचा दोघांचा एकत्र असलेला एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत रणबीर रेड टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स मध्ये तर शाहरुख ब्लॅक स्वेट शर्ट आणि आर्मी प्रिंट कार्गोमध्ये दिसत आहे. या फोटोत ते दोघेही खूपच हँडसम दिसत आहेत. पण हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर शाहरुख अथवा रणबीरच्या लूकची चर्चा न होता एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा होत आहे.

शाहरुख खान आणि रणबीरच्या या फोटोत त्यांच्या मागे एक कुत्रा दिसत आहे. नेटिझन्सने शाहरुख अथवा रणबीरचे कौतुक करण्याचे सोडून ते कुत्र्याची तारीफ केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, अरे वा.... हा कुत्रा किती सुंदर दिसतोय.... तर एका नेटिझन्सने तर चक्क कुत्र्याला स्टार म्हटले आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, सर्वात मोठा स्टार शाहरुख आणि रणबीरच्या मध्ये उभा आहे तर एकाने या फोटोत कुत्राच भाव खावून गेला अशी कमेंट केली आहे.

रणबीर कपूर सध्या त्याच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट, अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर तो शमशेरा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे तर शाहरुख राकेश शर्मा या अंतराळवीराच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :शाहरुख खानरणबीर कपूर