Join us

बोमनवरील बातम्यांनी दिया नाराज

By admin | Updated: October 25, 2014 23:44 IST

दिया मिङर आणि साहील संघा यांच्या लग्नानंतर अशी बातमी होती की, या लग्नास बोमन इराणी अनुपस्थित राहिल्याने दिया खूप दु:खी आहे.

दिया मिङर आणि साहील संघा यांच्या लग्नानंतर अशी बातमी होती की, या लग्नास बोमन इराणी अनुपस्थित राहिल्याने दिया खूप दु:खी आहे. बोमनने दियाला वचन दिले होते की दियाच्या लग्नात तो तिचे कन्यादान करेल; पण चित्रपटांत बिझी राहिल्याने त्याला या लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. या बातम्यांमुळे दिया नाराज झाली असून तिने मीडियाला एक खुले पत्र लिहिले आहे. दियाने लिहिले की, ‘मी तुम्हाला सांगू इच्छिते की, बोमन माङया वडिलांप्रमाणो आहेत. माङया लग्नात त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते दु:खी आहेत, जे गाढ प्रेमात आणि नात्यात स्वाभाविक आहेत; पण त्यांच्या अनुपस्थितीमुळे बनवण्यात येत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना जास्त दु:खी करणा:या आहेत. मी खूप आभारी राहील जर तुम्ही हे समजून घेतलंत की, आमच्या प्रेम आणि आदराच्या नात्यामध्ये इतर काहीही येऊ शकत नाही. एका दुर्भाग्याच्या प्रसंगासाठी अशा प्रकारचे चुकीचे लेख काहीही करू शकणार नाहीत. मला सादर करताना तुम्ही नेहमीच संतुलित आणि चांगले राहिले आहात, यावेळीही मला तुमच्याकडून तशीच अपेक्षा आहे.’