स्टायलिश, हटके, ग्लॅमरस लूक अशी लूक्सची आपण विविध नावे ऐकली आहेत. ‘ट्रॅव्हलिंग लूक’ असा शब्द तुम्ही कधी ऐकला आहे का? हा शब्द ऐकून हा लूक म्हणजे काय असतो, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल? याच प्रश्नाचे उत्तर अभिनेत्री मनवा नाईकने सोशल मीडियावर दिले आहे. तिने हे उत्तर तिच्या फोटोच्या माध्यमातून दिले आहे. मनवाने गाडीत बसून एक सुंदर फोटो काढला आहे आणि हा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तिने झक्कास गॉगल लावला असून, डोक्यावर पदर घेतला आहे आणि या गेटअपला तिने ‘ट्रॅव्हलिंग गेटअप’ असे नाव दिले आहे. गाडीतून जाताना केस खराब होऊ नयेत किंवा थंडी वाजू नये, म्हणून डोक्यावर पदर, ओढणी अनेक जण घेतात. पण मनवाने थेट या लूकला ‘ट्रॅव्हलिंग लूक’ असे नावच दिले आहे. तिच्या डिक्शनरीतील या नवीन शब्दाला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
मनवाने शोधला नवा शब्द
By admin | Updated: September 2, 2016 03:16 IST