Join us

नव्या ढंगात नव्या रुपात येणार "माहेरची साडी"

By admin | Updated: June 4, 2017 16:31 IST

मराठी सिनेमाच्या इतिहासातली रेकॉर्डब्रेक माहेरची साडी आता सिक्वेलच्या रुपात परत एकदा आपल्या भेटीला येत आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 4 - 1991 साली रिलीज झालेल्या माहेरची साडीया चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः मोहिनी घातली होती. मराठी सिनेमाच्या इतिहासातली रेकॉर्डब्रेक माहेरची साडी आता सिक्वेलच्या रुपात परत एकदा आपल्या भेटीला येत आहे. निर्माते विजय कोंडके यांनी या सिक्वेलची घोषणा केली आहे.90 च्या दशकात पहिल्यांदा घराघरातून महिला बाहेर पडल्या त्या माहेरची साडी हा सिनेमा पाहण्यासाठी. त्याकाळी माहेरची साड" हा सिनेमा पाहिलेली एकही व्यक्ती राहिली नव्हती, असे म्हटले जाते. ग्रामीण भागातून तर हा चित्रपट बघण्यासाठी ट्रक-ट्रक भरुन प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये यायचे. तब्बल 12 कोटींची कमाई करणारा हा मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. अभिनेत्री अलका कुबलला या चित्रपटाने लोकप्रियता मिळवून दिली होती. आजही अलका कुबल यांना या चित्रपटासाठीच ओळखले जाते. या सिनेमाच्या निमित्ताने अलका कुबल स्टाईल सिनेमांची लाटच इंडस्ट्रीत आली होती. अलका कुबलला सुपरस्टार बनवण्यात माहेरची साडी या सिनेमाचा मोठा वाटा होता.सिनेमाची कथा आणि पटकथा ठरली असून निर्माते सध्या कलाकारांच्या शोधात आहेत. अलका कुबलला रातोरात स्टार करणारी माहेरची साडी सिक्वेलच्या निमित्ताने कोणाच्या पदरात पडते ते पाहाणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्यावर आधारलेल्या या सिनेमात अलका कुबल, विक्रम गोखले, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर यासारख्या मात्तबर कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत