सेलिब्रिटी जगतात ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू झाले आहे. नर्गिस फाखरीला तिची ‘हाउसफुल्ल ३’ को-स्टार लिसा हेडनकडून एक गिफ्ट मिळाले आहे. नर्गिसने त्या गिफ्टचा फोटो काढून तो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ख्रिसमस इज अल्मोस्ट हीअर अँड माय लव्हली को-अॅक्ट्रेस गेव्ह मी अ लिटल गिफ्ट फ्र ॉम हर कलेक्शन. बॉडी स्क्रब अँड आॅल नॅचरल! थँक यू लिसा हेडन फील फ्री टू सेंड मोअर एनीटाईम आॅफ द ईअर. उप्स इटस् नाइस.’ नर्गिसने २०११ मध्ये ‘रॉकस्टार’मधून डेब्यू केला होता. सध्या ती ‘हाउसफुल्ल ३’ साठी शूट करतेय. ३ जून २०१६ रोजी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
नर्गिसला मिळाले ‘ख्रिसमस गिफ्ट’
By admin | Updated: December 22, 2015 01:43 IST